प्रतिनिधी
मुंबई : आत्मघाती स्फोटाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा भोवतीचा बंदोबस्त वाढवण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक सुरक्षा देखील कडेकोट करण्यात आली आहे. राज्याचे तसेच केंद्रातले गृहमंत्रालय सतर्क होऊन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. Threat to kill Eknath Shinde through suicide blast
आत्मघाती स्फोटाद्वारे एकनाथ शिंदेंना धमकी आल्यानंतर त्यांनी आपण असल्या धमक्यांना भीत नाही. मी जनतेतला माणूस आहे. जनतेसाठी काम करत राहणारा आहे. माझ्यावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांनी त्यांचा त्यांचे काय होईल, याचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देशातील घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय वर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या धमक्या भारतातल्या नेत्यांना येत असल्याचे गुप्तचर खात्यांचे निरीक्षण आहे. एकनाथ शिंदे यांना आलेली धमकी याच कॅटेगिरीतली आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणात बरोबरच बाकी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्था कडेकोट करत आहेत.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नसून ते ठाकरे पवार सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना देखील त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गडचिरोलीत ते अनेक गावांमध्ये फिरून तिथल्या स्थितीची माहिती घेत विविध कामे मार्गी लावत होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु, त्या धमकीनंतर देखील एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी गडचिरोलीचा एक दौरा पूर्ण केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App