Eknath Shinde एकनाथ शिंदेंचे “पवार” आणि त्यांच्या शिवसेनेची “राष्ट्रवादी” होत चालली आहे का??

Eknath Shinde

नाशिक : Eknath Shinde महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून फक्त चारच दिवस झालेत, तरी भाजप – शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवता आला नाही म्हणून संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी या ठाकरे यांच्या शिलेदारांनी आणि बाकीच्या विरोधकांनी महायुतीला डिवचले. मराठी माध्यमांनी महायुती समोर आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत??, याची सगळी वर्णन करून झाली. कुणी कुणाला कोणती ऑफर दिली, ती कोणी नाकारली वगैरे बाताही मारून झाल्या. पण यापैकी ना विरोधकांना मराठी माध्यमांना मुख्यमंत्रीपदाचे खरे नाव सापडले, जे मोदी – शाहांच्या मनात आहे!! Eknath Shinde

या सगळ्यांमध्ये मराठी बातम्यांमध्ये येणाऱ्या बातम्या खऱ्या मानल्या, तर त्याचे साधारण सार असे निघते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा फारच वाढली आहे. तिला त्यांच्याच शिवसेनेतले नेते जोरदार हवा देत आहेत. अनेक जण पुढे येऊन प्रेस मध्ये स्टेटमेंट देत आहेत. महाआरत्या करत आहेत सोशल मीडियातून दबाव वाढवत आहेत आणि त्यातूनच शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची वातावरण निर्मिती सुरू आहे. Eknath Shinde

– राष्ट्रवादीची जुनी वातावरण निर्मिती

पण हा सर्व प्रकार शरद पवारांच्या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस सारखाच दिसू लागला आहे. 1999 ते 2014 दरम्यान शरद पवारांची सुद्धा अशीच महत्त्वाकांक्षा फुलायची. त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते पत्रकारांना हाताशी धरून वेगवेगळ्या बातम्या पेरायचे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणारच, फक्त तो कोण होईल??, हे पवार साहेब ठरवतील, असे बातम्यांमधून सगळ्या महाराष्ट्रात पसरवले जायचे. पण शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते वातावरण निर्मिती करण्यामध्ये जेवढे माहीर होते, तेवढे काँग्रेसचे नेते माहीर नव्हते. त्यामुळे ते काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाकडे डोळा लावून बसायचे त्यांच्यातल्या त्यांच्यात लॉबिंग करायचे. दिल्लीत जाऊन हायकमांड मधल्या नेत्यांना भेटायचे, पण त्यातून काँग्रेससाठी कुठली वातावरण निर्मिती व्हायची नाही. शरद पवार आणि राष्ट्रवादी यांच्याच वातावरण निर्मितीचे ढोल त्यावेळी प्रसार माध्यमांमध्ये वाजायचे.


Bangladesh बांगलादेशातील हिंदू पुजाऱ्याच्या अटकेवर भारताने नोंदवला तीव्र आक्षेप


पण या सगळ्या घटनाक्रमाला 10 – 12 दिवस उलटून गेले की प्रणव मुखर्जी, वायलर रवी वगैरे हायकमांडचे बॉसेस महाराष्ट्रात यायचे आणि दोन-तीन तासांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवून निघून जायचे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीतरी काँग्रेस नेताच व्हायचा, फक्त त्यांची नावे बदलत राहायची. मग कधी विलासराव, कधी सुशीलकुमार, कधी अशोक चव्हाण, तर कधी पृथ्वीराज चव्हाण अशी त्यांची नावे असायची!!

शरद पवार आणि राष्ट्रवादीची वातावरण निर्मिती काँग्रेस हायकमांडचे बॉसेस महाराष्ट्रात येईपर्यंत जोरावर असायची, पण एकदा का काँग्रेस हायकमांडचे बॉसेस महाराष्ट्रात आले, की पुढच्या दोन-तीन तासांत पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते “थंड” पडायचे. काँग्रेस हायकमांडच्या बॉसेस पुढे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे काही चालायचेच नाही. त्यांना मुकाटपणे दोन तीन जास्त मंत्रिपदे पदरात घेऊन गप्प बसायला लागायचे. त्यापलीकडे काही घडायचे नाही.

एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातल्या आजच्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदेंचा आता “शरद पवार” व्हायला लागलाय आणि त्यांच्या शिवसेनेची “राष्ट्रवादी” व्हायला लागली आहे, यापलीकडे त्याचे कुठलेही राजकीय संदर्भमूल्य दिसत नाही.

– एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर 0

मूळात शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले असले, तरी त्यांची बार्गेनिंग पॉवर 0 आहे. उद्या अतिधाडसी निर्णय घेऊन एकनाथ शिंदे जरी महायुतीतून बाहेर पडले, तरी भाजपला त्याचा 1 % देखील फरक पडणार नाही. उलट भाजपचे केंद्रीय नेते अधिक आक्रमकपणे महाराष्ट्रात घुसतील. शिंदे यांना आत्ता सन्मानपूर्वक जे मिळायचे, ते ते देखील नंतर मिळू शकणार नाही. मराठी माध्यमांच्या बातम्यांचे ढोल 4 दिवस पिटत राहतील, त्यातून एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा फार तर फुलत राहील, पण प्रत्यक्षात शिंदे सेनेच्या हाती काही लागण्याची सुतराम शक्यता नाही. आत्ता भाजप हायकमांडच्या मनात जी असेल, त्या पलीकडे दुसरी कुठलीही राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाही आणि “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांना त्याचे आकलन करण्याची क्षमता उरलेली नाही.

Though his ambition grows, Eknath Shinde’s bargaining power is 0

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात