२५ वर्षे मुंबईत सत्ता गाजवणाऱ्यांनी स्वतःची घरे भरली; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल 

प्रतिनिधी

मुंबई : हजारो लिटर पाणी आम्ही कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात पाठवत होतो, ज्यांनी २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली, त्यांनी फक्त स्वतःची घरे भरली, परंतु यावर तीन वर्षे काही केले नाही, कारण यात टक्केवारी मिळत नव्हती. आता आम्ही सत्तेवर आलो आहोत आणि या प्रकल्पाचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हाणला. Those who ruled Mumbai for 25 years filled their own houses; Deputy Chief Minister Fadnavis’ attack

मुंबईसाठी विविध प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बीकेसी येथील मैदानात आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.


देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुन्हा सुरू; मंत्रिमंडळाचा निर्णय


४ वर्षांपूर्वी आम्ही मुंबईचे रस्ते तपासले आणि सगळ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वत्र लोकप्रिय आहेत, त्यांच्या लोकप्रियतेची स्पर्धा घेतली तर त्यात मुंबई प्रथम असेल, इतके प्रेम मुंबई पंतप्रधानांवर करते. पंतप्रधान मोदी यांनी ‘तुम्ही महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार आणा, असे सांगितले होते, पण अडीच वर्षात काहीच झाले नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आपले सरकार आले आणि महाराष्ट्र विकासाच्या रस्त्यावर धावत आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रम

प्रधानमंत्री स्वनिधीचा कार्यक्रम आज सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो समाजातील शेवटच्या घटकासाठी अर्थात फेरीवाले आणि छोटे व्यावसायिक यांना आर्थिक मदत करण्याची ती योजना होती. पण मविआ सरकारने ही योजना लागू केली नाही, मात्र आम्ही १ लाख १५ हजार लोकांना स्वनिधी देत आहोत. मुंबईसह इतर ठिकाणीही ही योजना लागू होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्या ज्या प्रकल्पांचे उदघाटन केले, त्याचे उदघाटनही तेच करत आहेत. ही निराळी संस्कृती उदयास येत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Those who ruled Mumbai for 25 years filled their own houses; Deputy Chief Minister Fadnavis’ attack

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात