वृत्तसंस्था
मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे दोन दिवस उरले आहेत. विधिमंडळात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून कोरोना चाचणी करणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. Those entering the legislature from today To test corona: Aditya Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे अधिवेशनाला गैरहजर आहेत. याबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. तसेच विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला. एक मंत्री आणि एका आमदारालाही कोरोना झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळ आवारात प्रवेशापूर्वी आजपासून प्रत्येकाची कोरोना चाचणी करणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
विधिमंडळ परिसरात दोनच दिवसांत ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह आमदार समीर मेघे यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “गर्दी वाढली आहे. ख्रिसमस न्यू-ईयर असताना लोक काळजी जास्त घेत नाहीत. प्रत्येकानं मास्क वापरणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेजबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार घ्यावा लागेल. शाळांसंदर्भात पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App