प्रतिनिधी
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त येत्या रविवारी १० जुलै रोजी रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी यात्रा स्पेशल जादा रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.This year, for the first time, 125 rounds of trains for Ashadi Yatra; Vidarbha – Marathwada, trains to Pandharpur from the south
प्रथमच रेल्वे गाड्यांच्या १२५ फेऱ्या उपलब्ध
आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच रेल्वे गाड्यांच्या १२५ फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. एसटी तिकीट दरापेक्षा कमी दरात रेल्वेने यात्रेसाठी पंढरीत दाखल होता येणार असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
– कुठून सोडण्यात येणार जादा गाड्या?
सुमारे दोन वर्षानंतर आषाढी यात्रा भरत असल्याने यावर्षी १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने यात्रा स्पेशल १२५ जादा फेऱ्या करणार आहे. यात्रा कालावधीत लातूर, नागपूर, अमरावती, खामगाव येथून जादा रेल्वेगाड्या येणार आहेत. याशिवाय दादर-पंढरपूर, नागपूर-कोल्हापूर, निजामाबाद-पंढरपुर, बेंगलोर यशवंतपुर-पंढरपूर आदी नियमित रेल्वे गाड्याही धावणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App