वृत्तसंस्था
टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून जपान मधील नारा शहरामध्ये एका जाहीर सभेत भाषण करत असताना आबे यांच्यावर हल्लेखोराने समोरून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Deadly attack on former Japanese Prime Minister Shinzo Abe; Bullets fired at a public meeting !!; Excellent chemistry with Modi
स्थानिक टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार एका कार्यक्रमात अबे भाषण करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यानंतर तिथे उपस्थित गर्दी पूर्णपणे हापकून गेली परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने आबे यांना रुग्णालयात हलवले आहे.
#WATCH | Ex-Japanese PM Shinzo Abe shot during a speech in Nara city. Fire Dept says he's showing no vital signs, is in cardiopulmonary arrest & scheduled to be transferred by medevac to Nara Medical University. Shooter nabbed. Aerial visuals from Nara City. (Source: Reuters) pic.twitter.com/OSVxn48fyD — ANI (@ANI) July 8, 2022
#WATCH | Ex-Japanese PM Shinzo Abe shot during a speech in Nara city. Fire Dept says he's showing no vital signs, is in cardiopulmonary arrest & scheduled to be transferred by medevac to Nara Medical University. Shooter nabbed.
Aerial visuals from Nara City.
(Source: Reuters) pic.twitter.com/OSVxn48fyD
— ANI (@ANI) July 8, 2022
आबे मोदी घनिष्ठ संबंध
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो व्हावे आणि भारताचे विद्यापन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अतिशय घनिष्ठ मैत्री संबंध आहे. शिंजो आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मोदींनी जपानला दोनदा भेट दिली. त्यावेळी त्यांच्यातील वैयक्तिक केमिस्ट्री हा जागतिक राजकारणातल्या चर्चेचा मोठा केंद्रबिंदू बनला होता. त्याचबरोबर भारत – अमेरिका – जपान आणि ऑस्ट्रेलिया हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला चतुष्कोन क्वाडच्या स्थापनेत आणि ही संघटना वृद्धिंगत करण्यात शिंजो आबे यांचा सर्वाधिक मोलाचा वाटा राहिला आहे. क्वाडच्या बैठकांना ते सर्वाधिक वेळा उपस्थित राहिलेले जपानचे पंतप्रधान ठरले आहेत.
आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन विरोधात ठाम भूमिका घेऊन जपान सह भारतासारखे आंतरराष्ट्रीय शक्ती जोडून घेऊन वाढ संघटनेला मजबुती देण्याचे फार महत्त्वाचे काम आबे यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात झाले आहे.
अबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कारकिर्दीत भारताला दोनदा भेट दिली असून त्यापैकी एकदा ते भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे देखील राहिले आहेत. 2015 मध्ये आपल्या भारत दौऱ्यात शिंजो अभियान आबे यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले होते. त्याचबरोबर वाराणसीतील गंगा आरती समारंभात देखील ते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यात शिंजो आबे यांनी त्यांना स्वतःच्या खाजगी निवासस्थानी खास निमंत्रण देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App