कर्तृत्ववान व्यक्तीला दुय्यम स्थान दिले की असे घडते; अजितदादांच्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना टोला!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या महाभूकंपात अजित पवारांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समवेत 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला हाणला आहे. कर्तृत्ववान व्यक्तीला दुय्यम स्थान दिले की असे घडते, हे महाराष्ट्राने आधी पाहिले आहे. तेच आज घडलेले पुन्हा महाराष्ट्राने पाहिले आहे, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. This is what happens when an accomplished person is given secondary status

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याची राजकीय खेळी करताच अवघ्या महिना-दीड महिन्यात अजित दादांनी बंड करून पवारांचे राजकीय मनसुबे उध्वस्त केले.

शपथविधी समारंभा नंतर पत्रकारांची ते बोलत होते अजितदादांनी विकासाच्या राजकारणासाठी आम्हाला साथ दिली आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात डबल्स इंजिन सरकार कार्यरत होतेच. आता त्याला तिसरे इंजिन जोडले गेले आहे. त्यामुळे सरकार आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णपणे सरकारला पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट होत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधले 30 ते 40 आमदार अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. पक्षाचे प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी आज अजितदादांबरोबरच मंत्रीपदाची शपथ घेतल्याने विधिमंडळ पक्षात देखील फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट मधून शरद पवारांची त्यांचे बोलणे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या समावेत आपण परत नव्याने सर्व उभे करू, असे वक्तव्य शरद पवारांनी केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

This is what happens when an accomplished person is given secondary status

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात