प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत ब्राह्मण संघटनांनी त्यांच्या समाजाच्या विकासासाठी परशुराम महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर शरद पवार यांनी ‘आपण हा विषय राज्य सरकारच्या अधिकाराखालील आहे, त्यामुळे आपण यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करू. येत्या महिना-दीड महिन्यात ही बैठक आयोजित होईल, असे सांगितले.There is no reservation for the Brahmin community
– जाती – धर्मावर टीकाटिप्पणी होणार नाही
९-१० ब्राह्मण संघटनांच्या ४० प्रतिनिधींसोबत शनिवारी, २१ मे रोजी बैठक झाली. त्यानंतर पवार यांनी माध्यमांशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण समाजात अस्वस्थता निर्माण झाली, असे म्हटले, त्यावर आपण यापुढे आमच्या पक्षातील नेत्यांकडून कुठल्याही जाती – धर्म यावर टीकाटिप्पणी होणार नाही, तशा सूचना केल्याचे आपण सांगितल्याचे पवार म्हणाले. या बैठकीत या संघटनांनी ग्रामीण भागातील वर्ग नागरी भागात येत आहे, त्यामुळे साहजिकच नोकरी क्षेत्रात संधी मिळावी अर्थात आरक्षण असावे, अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर आपण ब्राह्मणांचा आरक्षणाचा मुद्दा बसत नाही, पण मागास वर्गाला आरक्षण द्यावेच लागेल, त्यामुळे आरक्षणाला विरोध करू नये, असे मी सांगितले. त्यावर ब्राह्मण संघटनांनी कोणतीही भूमिका मांडली नाही, असेही पवार म्हणाले. ब्राह्मण समाजाने पहिल्यांदा आपल्याशी चर्चा करण्याची मागणी केली. यामुळे आम्हाला याचा राजकीय लाभ होणार की नाही, हे सांगायला फडणवीस यांच्यासारख्या ज्योतिषाची गरज नाही, असेही पवार म्हणाले.
राज्यसभा : राष्ट्रवादीची उरलेली मते शिवसेनेला
मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीत आमच्याकडे १ चा जागा होती, तेव्हा आम्ही शिवसेनेकडे दोन जागा मागितल्या होत्या, त्यावर बदल्यात सेनेने आम्हाला पुढील निवडणुकीत म्हणजे आता दोन जागा द्यावी असे ठरवले होते, त्यामुळे यावेळी आमची एक जागा निवडून आल्यावर जी मते उरतील ते आम्ही शिवसेनेला देणार आहे. त्यावेळी शिवसेना छत्रपती संभाजी यांना उमेदवारी देणार किंवा अन्य कुणाला, आमची मते त्यांनाच असतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App