माझ्याकडे कोणी राजीनामा द्यायला आले, तर मी त्याला का नाकारू??; भगतसिंह कोश्यारींचा खोचक सवाल

वृत्तसंस्था

डेहरादून : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत निकाल देताना तत्कालीन राज्यपालांच्या काही कायदेशीर कृतींवर बोट ठेवत ताशेरे ओढले आहेत. या मुद्द्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्याकडे कोणी राजीनामा घेऊन आले, तर मी त्याला राजीनामा देऊ नको असे सांगू का??, असा खोचक सवाल कोश्यारी यांनी केला आहे. There is no point in talking about Uddhav Thackeray’s resignation now

राज्यपालांना पक्षांतर्गत वादाकडे पाहण्याचा अधिकारी नाही. राज्यपालांनी सरकारवर शंका घेण्याचे कारण नव्हते. त्यामुळे बहुमत चाचणी बोलवण्याची गरज नव्हती. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावून एकप्रकारे पक्षांतर्गत फुटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, जो पूर्णपणे गैर आणि असंविधानिक आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. गुरुवारी, ११ मेला सर्वोच्च न्यायालयाने बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाला दिला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही. कारण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवत शिंदे सरकारला मोठा दिलासा दिला. यावर आता तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.



काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?

प्रसार माध्यमांसोबत बोलताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ‘मी राज्यपाल पदावरून मुक्त झालो आहे. याला तीन महिने झाले आहेत. मी आता राजकीय प्रकरणांपासून स्वतःला खूप दूर ठेवतो. आणि जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होते, त्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्या निकालावर जे कायदेतज्ज्ञ आहेत तेच प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला फक्त संसदीय परंपरा माहिती आहेत. मी त्यावेळेस जो निर्णय घेतला तो विचारपूर्वक घेतला. जर माझ्याकडे कोणाचा राजीनामा आला, तर मी त्यांना काय नको देऊ राजीनामा असं म्हणणार का? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणे माझे काम नाही. काय चूक? काय बरोबर? हे ठरवणे विश्लेषकाचे काम आहे. हे माझे काम नाही.

There is no point in talking about Uddhav Thackeray’s resignation now

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub