भुजबळ – अजितदादांच्या भूमिकेत फरक नाही!!; जरांगे – भुजबळ वादात बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ परस्परविरोधी टोकाला उभे राहिले असताना प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेत कोणताही फरक नाही, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. There is no difference in the role of Bhujbal and ajit pawar

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलकांनी लावून धरली आहे.

मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांना धारेवर धरले आहे, तर छगन भुजबळ ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण नको. मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या, या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या भूमिकेत काही फरक नाही. त्यांची भूमिका समानच आहे. छगन भुजबळ वरिष्ठांच्या आदेशाशिवाय असे बोलत नाहीत. छगन भुजबळ आणि अजित पवारांची भूमिका सारखीच आहे. इतकेच काय, पण भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष ओबीसींचेच नेतृत्व करून पाहत आहेत, पण भुजबळांनी या दोघांनाही मागे टाकले असून भुजबळ हेच ओबीसींचे खरे नेते आहेत, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारवर चांगले परिणाम होणार नाहीत, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. मराठा समाज कुणबी नाही का?? तो राजपूत गुजराती आहे का?? मराठा समाज अमेरिकन, जपानीज आहे का??, हेच तुम्हाला सांगता येत नाही तर उलट्या बोंबा का मारता आहात??, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता.

There is no difference in the role of Bhujbal and ajit pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात