वनवासी हा शब्द आदिवासींना मान्य नाही; शरद पवार यांचा गडचिरोलीत दावा

प्रतिनिधी

गडचिरोली : आदिवासी म्हणतात, आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत. त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका. याचा अर्थ आदिवासींना वनवासी हा शब्द मान्य नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडचिरोलीतील कार्यक्रमात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरच्या कार्यक्रमात वारंवार वनवासी असाच उल्लेख केला होता. या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला घेरले आहे.The word forest dwellers is not acceptable to the tribals; Sharad Pawar’s claim in Gadchiroli

शरद पवार म्हणाले की, आदिवासी तरुणांना प्रगतीपथावर आणण्यासाठी असलेल्या योजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. आदिवासी वर्गामध्ये विकासात्मक बदल करण्याचा पक्षाचा विचार आहे. गेल्या वर्षी इंदौरला आम्ही मोठी आदिवासी परिषद घेतली. त्यानंतर नागपूरलाही मोठा कार्यक्रम घेतला.

मागील आठवड्यात नाशिकमधील आदिवासीबहुल इगतपुरी तालुक्यातही आम्ही क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी जमलो होतो. भांगरे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. हा त्याग आदिवासी कुटुंब करु शकते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, की आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे. आज आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर वनसंपत्ती, जंगल याचे रक्षण केले गेले पाहीजे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींचे संवर्धन करत आहे

राज्यात, देशात जे जलसंपदा प्रकल्प झाले, त्यात जास्तीत जास्त आदिवासींची जमीन गेली. आदिवासींच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा झाला आणि त्याचा फायदा इतर क्षेत्रांना झाला. पर्यावरणाची राखण करणारा वर्ग म्हणून आदिवासींची ओळख असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

The word forest dwellers is not acceptable to the tribals; Sharad Pawar’s claim in Gadchiroli

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात