वृत्तसंस्था
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाचा पत्ता दोन संशयित व्यक्तींने विचारल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांना दिली आहे. या माहितीनंतर अँटिलियाची सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसरात नाकेबंदीही करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी यासंबंधीची चौकशी आणि तपास करत आहेत The two suspects asked for Ambani’s Antilia address; Excitement in Mumbai; Blockade in the area
ॲटिलिया संबंधी दोन संशयित व्यक्ती चौकशी करत असल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर अँटिलियाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन व्यक्ती आपल्याकडे अँटिलिया नेमके कोठे आहे याबाबत विचारत होते, अशी माहिती एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांना दिली. या दोघांकडे एक बॅग असल्याचेही टॅक्सी चालकाने सांगितले.
टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीवर गंभीरपणे विचार करून पोलिसांनी अँटिलियाची सुरक्षा वाढवली असून परिसरात नाकेबंदीही केली आहे. टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिस यंत्रणांनी कारमधून आलेल्या तरुणांचा शोध सुरू केला आहे.
Security heightened outside Mukesh Ambani's residence 'Antilia' after Mumbai Police received a call from a taxi driver that two people carrying a bag asked for Ambani's residence. pic.twitter.com/RW5uMtcleK — ANI (@ANI) November 8, 2021
Security heightened outside Mukesh Ambani's residence 'Antilia' after Mumbai Police received a call from a taxi driver that two people carrying a bag asked for Ambani's residence. pic.twitter.com/RW5uMtcleK
— ANI (@ANI) November 8, 2021
सचिन वाझे आणि इतर पोलिसांनी कट रचून ॲन्टिलिया बाहेर स्फोटके ठेवली होती. त्यानंतर मनसुख हिरन यांची हत्याही करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी ही माहिती गांभीर्याने घेतली असून कारमधील दोघे सापडल्यानंतर नेमके काय प्रकरण आहे हे समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी अँटिलियाबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. कारमध्ये एक चिठ्ठीही सापडली होती. त्यात मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. ही कार मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची होती. हिरण याने एका आठवडाभरापूर्वी आपली कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. एका आठवड्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App