पुण्यातील ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकाराची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Rupali Chakankar

या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे; आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील एका महिलेच्या सासरच्याने जादूटोणा करण्यासाठी तिचे हात पाय बांधून आपल्या सुनेचे मासिक पाळीतील रक्त विकण्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय राज्य महिला आयोगानेही याची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे. The State Women Commission has taken note of the outrageous practice of selling menstrual blood in Pune

या प्रकारवर प्रतिक्रिया देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितेले की, ‘’पुणे शहरात सुनेवर बळजबरी करून मासिकपाळीच्या रक्ताचा जादूटोण्यासाठी ५० हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची घटना समोर आली. अतिशय घृणास्पद, लाजीरवाणी अशी ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी तर आहे. विकृत मानसिकता असणाऱ्या या आरोपींवर तत्काळ कारवाई व्हायला हवी. राज्य महिला आयोगात यात संबंधितांना निर्देश देईलच पण पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रद्धेला बळी पडणारी कुटु्ंब आहेत ही दुदैवी आहे.’’


पाळीचे रक्त विकणे, अंधश्रेद्धे पलीकडची विकृती..


याशिवाय ‘’दोनच दिवसांपुर्वी जागतिक महिला दिन साजरा करत आपण सर्वांनीच स्त्री शक्तीचा सन्मान केला आणि आज अशा घृणास्पद घटनेत महिलेवर झालेले अत्याचार पाहून अजून किती आणि कसा लढा बाकी आहे असा प्रश्न पडतो.’’ असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून हीनकृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The State Women Commission has taken note of the outrageous practice of selling menstrual blood in Pune

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात