केंद्राने वारंवार सांगूनही राज्य सरकारचे रुग्णालयांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला.The state government does not pay attention to the security of hospitals; Union Minister of State for Health Dr. Allegation of Bharti Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून राज्यांना वारंवार सूचना केल्या जातात. परंतु महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच भंडारा आणि नगरसारख्या घटना वारंवार होतात. राज्यात रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना घडत असून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. केंद्राने वारंवार सांगूनही राज्य सरकारचे रुग्णालयांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला.
भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्याकडून आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होत्या. फायर ऑडिट करू, फायर सेफ्टी मेजर करू, असे राज्य सरकारने भंडारा येथील घटना घडल्यानंतरही सांगितले होते. पण प्रत्यक्षात तसे काही केले नाही.
त्यामुळे त्या घटनेची पुनरावृत्ती नगर येथे झाली. राज्य सरकारने उपाय योजना करून काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर एका पाठोपाठ एक अशा घटना घडत जातील आणि निर्दोष नागरिकांचे जीव जात राहतील, असे डॉ. पवार म्हणाल्या.
राज्यात रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडत असून, वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारद्वारा सातत्याने राज्याला सूचना देण्यात येतात. या बाबतीत सतर्क राहा, काळजी घ्या, असे आवाहन केले जाते. पण राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. आत्ताची घटना घडल्यानंतरही राज्य सरकारने सांगितले की, फायर ऑडिट, फायर सेफ्टी मेजर करू. पण यावेळी सरकार ते करेल की नाही, याची शाश्वती नाही, अशी शंका डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App