विशेष प्रतिनिधि
पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गाड्यांमध्ये सध्या जे हॉर्न आहेत, त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे सांगितल्यानंतर, आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. The sound of the siren on the ambulance will change
नितीन गडकरींनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटले की, आता मी आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी. आताचा कर्कश सायरन ॲम्ब्युलन्सवर नको, असे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सध्या गाड्यांमध्ये जे हॉर्न आहेत, त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे सांगितले होते.
आता तुमच्या गाड्यांमध्ये कर्कश आवाजांच्या हॉर्नच्या जागी मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App