‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घेण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले निर्देश
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ‘अंमली पदार्थमुक्त मुंबई’ चा आढावा घेण्यात आला. तसेच, मुंबई अंमली पदार्थमुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील दहा दिवसांत सुमारे ७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. The Shinde Fadnavis government has undertaken a campaign to make Mumbai drug free
अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहिम हाती घ्या. अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करा. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्याचे निर्देश –
अंमली पदार्थ निर्मितीचे कारखाने उध्वस्त करा. मुंबई महानगरातील विद्यालयांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून अंमली पदार्थविरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अंमली पदार्थमुक्त मुंबई करतानाच राज्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे पेव फुटले आहे का याबाबत दक्ष राहून कारवाई करावी. जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
शाळा आणि महाविद्यालयांजवळील हजारांहून अधिक पान ठेल्यांवर कारवाई –
गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिस, मुंबई महापालिका यांच्यावतीने अंमली पदार्थ विक्री करणारे पान ठेले, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळील सुमारे १३७१ पान ठेल्यांवर कारवाई करून हटविण्यात आले आहेत. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत ई-सिगारेटस प्रकरणी ७३९१ जणांवर कारवाई झाली आहे. पदपथावरील ६२६३ हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील २८१९ हॉकर्स विरुद्धदेखील या मोहिमेंतर्गत कारवाई झाली आहे.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App