विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल रात्री मुंबई येथील नार्कोटिक विभागाने अमली पदार्थ विरोधात फार मोठी कारवाई केली आहे. मुंबई वरून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर छापा टाकून तेथे सुरु असलेली रेव्ह पार्टी उधळली आहे. The rave party on the ship broke up; Children of Bollywood actors participate
मुंबई – गोवा मार्गावर जाणाऱ्या जहाजाचे एक तिकीट तब्बल ८२ हजार रुपयांना विकले गेले होते. या पार्टीत मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीचे मुले असल्याचे सुद्धा समोर आले आहे. या सोबतच दिल्लीतील एका व्यापाराचे सुद्धा कनेक्शन या पार्टीमध्ये असल्याचे समोर आले आहे. आता या सर्वांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. ही धडक कारवाई पोलिस अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे. जहाज खोल समुद्रामध्ये गेल्यानंतर ड्रग पार्टी सुरू होणार होती.
खबर मिळताच एनसीबी टीमने सापळा रचून प्रवासी म्हणून जहाजात प्रवेश मिळविला आणि या पार्टीचा पर्दाफाश केला. सूत्रांनी सांगितले की हे जहाज शनिवारी गोव्यासाठी रवाना झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App