विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आताचे शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेले आहेत, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी केले असून त्यावरुन कोल्हापूरात वाद उफाळला असून मंडलिक यांच्या समर्थनात आणि विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पण हा सगळा प्रचार राजकारण किती खालच्या पातळीवर चालू आहे हे दाखवणारा असल्याचे शरद पवार म्हणाले. पण भाजपच्या नेत्यांनी पवारांच्या आणि संजय राऊत यांच्या जुन्या वक्तव्यांचा आरसा त्यांना दाखवला.
संजय मंडलिक काय म्हणाले, हे मला माहिती नाही. राजघराण्यात दत्तक घेणे हे काही नवीन नाही. तशी अनेक उदाहरणे आहेत. पण दत्तक घेतल्यानंतर ती व्यक्ती त्या घराण्याचा सदस्य, प्रतिनिधी होतो. अशा विधानांवर राजकारण किती खालच्या स्तरावर जात आहे याचे मूर्तीमंत उदाहरण आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
शाहू महाराज हे जनमानसात आदरणीय व्यक्तिमत्व आहे. अनेक संस्थांचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. मूळ शाहू महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर ते काम करत आहेत. अशा व्यक्तिमत्वाच्या संबधी असं विधान करत विरोधक आपली मानसिकता दाखवत आहेत,” अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
संजय मंडलिक नेमके काय म्हणाले??
आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थाने पूरोगामी विचार जपला, असे संजय मंडलिक म्हणाले. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार??, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.
भाजपचे वक्तव्याला समर्थन नाही
छत्रपतींच्या घराण्याचा अवमान करण्याचे संजय मंडलिक यांच्या मनात असू शकत नाही. अनेकदा राजघराण्याविषयी अशा प्रकारचे बोलले गेले आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली.
राऊत पवारांची वक्तव्ये कोणत्या संस्कृतीत बसतात??
पण त्याच वेळी भाजपचे विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. संजय राऊतांनी याच शाहू महाराजांकडे छत्रपतींच्या वंशाजत्वाचे वंशजांचे पुरावे मागितले होते, हे कुठल्या संस्कृतीत बसते??, असा सवाल केला. राज्याचे तथाकथित”जाणते राजे” शरद पवार पूर्वी बोलले होते छत्रपती पेशवे नेमायचे. पण ज्यावेळी संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळी पवार म्हणाले होते, आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागलेत. निवडणूक आली म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय रूपांतरित करता येतेय का? याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App