वृत्तसंस्था
सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारी नट सुधीर कलिंगण (वय ५३ ) यांचे निधन झाले. त्यामुळे कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. The pillar of Dashavatari Natyakshetra in Konkan was lost; Sudhir Kalingan dies due to illness
सुधीर कलिंगण हे श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक होते.सुविख्यात दशावतारी नट बाबी कलिंगण यांचे ते सुपूत्र होते. आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे त्यांनी पुढे नेला. पारंपरिक दशावतारी कलेचे आधुनिकीकरण करणाऱ्या नवीन नाट्यनिर्मिती सादर करून त्यांनी ठसा उमटवला.
दशावतारी राजा म्हणून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांना दशावताराचा लोकराज म्हणून ओळखले जात असे. तसेच दशावतार कला सातासमुद्रापार नेण्यात कलिंगण यांचा मोठा वाटा आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी असलेल्या सुधीर कलिंगण यांच्या निधनाने नेरूर व सिंधुदुर्ग शोककळा पसरला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App