महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात! आई शेतात-नराधमांकडून गतिमंद घरात घुसून बलात्कार

पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असताना, तिकडे बुलडाण्यातही तसाच प्रकार समोर आला आहे. लडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवर बलात्कार झाला आहे. अमडापूर इथे 15 सप्टेंबरला दुपारी ही घटना घडली. The mother was raped by the men in the field


विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : पुण्यातील बलात्काराच्या घटनांनी राज्यभर रोष व्यक्त होत असताना, तिकडे बुलडाण्यातही तसाच प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गतिमंद तरुणीवर बलात्कार झाला आहे. अमडापूर इथे 15 सप्टेंबरला दुपारी ही घटना घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटकही केली आहे.

दोन्ही आरोपी अमडापूर इथलेच रहिवासी आहेत. अमडापूर येथील 19 वर्षीय गतिमंद मुलगी घरी एकटीच होती. तिची आई शेतात कामासाठी गेलेली होती. गावातीलच दोन्ही नराधम घरात मुलगी एकटीच असल्याचे पाहून घरात घुसले. दोघांनी तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

पीडितेची आई शेतातून घरी आली असता दोघांनी तेथून पळ काढला. घडलेला प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला, त्यानंतर पीडितेच्या आईने मुलीला घेऊन अमडापूर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी दोघांविरुद्ध तक्रार दिली.



पोलिसांनी आरोपींविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्हीही आरोपींना अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही आरोपींना एक दिवसाचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुण्यातील वानवडी बलात्काराने महाराष्ट्र हादरला

पुण्यातील वानवडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात दररोज धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. 13 वर्षीय पीडितेवर केवळ पुण्यातच नाही तर मुंबईजवळही अत्याचार झाल्याचे आता समोर आलं आहे. वानवडी पोलीस करत असलेल्या तपासाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. वानवडी पोलिसांनी ठाण्यातून एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 17 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झालं आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता.

The mother was raped by the men in the field

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात