मीडियातली इको सिस्टीम ठाकरे – पवार सरकारसाठी काम करतेय; काही लोक भाट झालेत!! देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात मीडियातील काही लोकांची इको सिस्टीम ठाकरे – पवार सरकारसाठी काम करत आहे. मीडियातील काही लोक अक्षरश: भाट झालेत भाट, अशा कठोर शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाचे वाभाडे काढले. झी 24 तासच्या मुलाखतीत ते बोलत होते.The media ecosystem is working for the Thackeray-Pawar government

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की या मीडियातले लोक आमचे सरकार असताना म्हणत होते, की सरकार कोणाचेही असो आम्ही विरोधात काम करणार. सरकारच्या चुका दाखवणार. पण आज त्याच मीडियातले काही लोक या सरकारच्या इको सिस्टीम मध्ये काम करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही लोक त्यांचे अक्षरशः भाट झाले आहेत.

या सरकार मधल्या काही लोकांनी माझ्याविषयी गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले काही नँरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न केले देवेंद्र फडणवीस अहंकारी आहे. परंतु मी जमिनीवरचा माणूस आहे. मी जमिनीवर बसू शकतो. झोपू शकतो. त्यांचा तो नेरेटिव्ह चालू शकला नाही. म्हणून मग वेगळ्या प्रकारे टीका चालू झाली. मीडियातल्या काही लोकांना हाताशी धरून लेख छापून आणले. कारण या सरकार मधली लोकांची तेवढी विश्वासार्हता नाही. म्हणून त्यांना मीडियातल्या लोकांना हाताशी धरावे लागले. त्यातूनही इको सिस्टीम तयार झाली. पण त्यातले काही काही लोक तर अक्षरशः भाट झाले आहेत, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

पण त्या इको सिस्टीम मुळे माझे काही वाकडे होणार नाही. ते माझ्या बाबतीत कोणताही नँरेटिव्ह सेट करू शकणार नाहीत. कारण जनतेला माहिती आहे मी कोण आहे आणि कसा आहे ते. मी जनतेमध्ये जातो आणि काम करतो. जनतेने माझे काम पाहिले आहे. जे माझ्या संपर्कात आले त्यांना मी कसा आहे हे पूर्ण माहिती आहे. त्यामुळे माझ्याविषयी या सरकारमधल्या लोकांनी आणि मीडिया मधल्या त्यांच्या भाटांनी कितीही गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले तरी ते सफल होणार नाहीत, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे.

The media ecosystem is working for the Thackeray-Pawar government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*