विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदावरी मातेची नित्य महाआरती पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याची परंपरा यंदाही पाळली गेली. काल नाशिकमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असतानाही ११ समर्पित गोदासेवकांनी पुराच्या पाण्यात उभे राहून महाआरती संपन्न केली.The Maha Aarti of Goddess Godavari was held even in heavy rain
या महाआरतीत ६ युवती गोदासेविका आणि ५ युवक गोदासेवक सहभागी झाले होते. पुराच्या पाण्यात पाय रोवून, मुसळधार पावसात निथळत, कोणताही खंड न पडू देता गोदामातेची पूजा व आरती करण्यात आली. खणा-नारळाने देवीची ओटी भरून महापूजा पूर्णत्वास नेण्यात आली.
विशेष म्हणजे, या प्रतिकूल हवामानातही अनेक भक्तांनी छत्र्या, रेनकोट अशा साधनांमध्ये उभे राहत महाआरतीला उपस्थिती लावली. गोदावरीचा विस्तृत पूर दोन्ही काठांवरून भरभरून वाहत असतानाही ‘सेवा अखंडच’ या समितीच्या ब्रीदवाक्यानुसार सेवा अबाधित ठेवली गेली.
या सेवेमुळे स्थानिक भाविकांमध्येही समाधान व्यक्त होत असून पूरकाळातही अखंड नित्यपूजेची परंपरा पुढील पिढीपर्यंत चालू राहावी, हा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा संकल्प आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App