महाराष्ट्र केसरी 2023 : नांदेडचा तुफानी मल्ल शिवराज राक्षेच्या हाती विजयाची गदा!!


प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब यंदा शिवराज राक्षेंने जिंकला आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे असा चित्तथरारक लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करीत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. तो 2023 चा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी कोथरुड येथे महाराष्ट्र केसरीचा हा अंतिम सामना रंगला होता. The mace of victory in the hands of the Shivraj Rakshe of Nanded

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह आयोजक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मानाची गदा शिवराज राक्षेला प्रदान करण्यात आली.

 

माती विभागातील उपांत्य फेरीत पैलवान महेंद्र गायकवाडने पैलवान सिंकदर शेखचा पराभव केला होता. तसेच गादी विभागातील उपांत्य फेरीत पैलवान हर्षवर्धन सदगीरला शिवराज राक्षेने ८-२ असा एकहाती डाव जिंकला होता. त्यानंतर मानाच्या केसरी गदासाठी महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेमध्ये झुंज झाली.

अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर चितपट मात करून महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. शिवराज राक्षे हा ६५वा महाराष्ट्र केसरी ठरला असून महेंद्र गायकवाड हा उपविजेता झाला आहे.

The mace of victory in the hands of the Shivraj Rakshe of Nanded

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात