विषेश प्रतिनिधी
मुंबई :पाच मे रोजी रिलीज झालेला केरळ स्टोरी हा सिनेमा रोज काही ना काही कारणाने चर्चेत आहे… नुकतच या चित्रपटाने दोनशे कोटीच्या क्लब मध्ये जाण्याचा विक्रम पूर्ण केला… The Kerala story team meet with central minister Nitin Gadkari ..
द केरळ स्टोरी रिलीज झाल्यापासून समाज माध्यमातून या सिनेमाबद्दल भरपूर वाद आणि प्रतिवाद बघायला मिळाले .. काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा आहे.. तर काहींच्या मते हा सिनेमा म्हणजे वास्तव ..उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला .. तर अनेक राज्यांमध्ये या सिनेमाचे काही खास शो आयोजित करण्यात आले..
बॉक्स ऑफिस वर या सिनेमांना धुमाकूळ घालत.. अनेक नवीन नवीन विक्रम निर्माण केले.. भारताबाहेर देखील इतर देशांमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे..
केरळ स्टोरी या सिनेमाच्या टीमने मुंबईत नुकतीच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.. आणि या टीम सोबत नितीन गडकरी यांनी काही वेळ संवाद साधला.
याबाबत चे फोटो नितीन गडकरी यांनी आपल्या समाज माध्यमातून शेअर केले आहे..
या भेटीमध्ये सिनेमाचे निर्माते विपुल शाह, आशीन शाह , याबरोबर अभिनेत्री सोनिया बलानी , योगिता बहानी, अदा शर्मा आधी कलाकार या भेटीमध्ये सहभागी होते.. या भेटीदरम्यान चित्रपटाविषयी चित्रपटा च्या निर्मिती प्रक्रियेविषयी चर्चा करण्यात आली..
केरळ स्टोरी हा सिनेमा केवळ मनोरंजन विश्वातच नाही तर राजकीय विश्वात देखील या सिनेमाची चांगली चर्चा आहे.. केवळ तीस कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App