दुर्मिळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सर्व पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करणारं ‘जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र’!

  • जाणून घेऊया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राचा इतिहास.

 


विशेष प्रतिनिधी

पुणे : नुकताच जागतिक पुस्तक दिन सगळीकडे साजरा झाला. पुणे शहराला वाचन संस्कृतीचा मोठा आणि समृद्ध वारसा आहे. पुण्यातील आणि बाहेरच्या शहरातील आलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी पुण्यात अनेक वाचनालय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांसाठी लाडकं ठरतं ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र. दरवर्षी हजारो विद्यार्थी या वाचनालयात ज्ञानार्जनाचं पवित्र काम करत असतात.The history of Savitribai Phule Pune University,’s Jaikar Library..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हटलं की, डोळ्यासमोर काही गोष्टी येतात. त्यात विद्यापीठातील निसर्गरम्य परिसर, इतिहासाची साक्ष देणारी दीडशे वर्षांहून अधिक जुनी विद्यापीठाची मुख्य इमारत आणि मागील अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाचा स्त्रोत ठरलेले जयकर ग्रंथालय म्हणजेच जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र.



यंदाचे वर्ष हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ७५वे म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आहे. तर जयकर ग्रंथालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष हे पुढील वर्षी सुरू होणार आहे. विद्यापीठाची स्थापना १९४९ मध्ये झाल्यानंतर लगेचच १९५० साली विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली. पुढे १९५७ मध्ये ग्रंथालयाला स्वतंत्र इमारत मिळाली व ग्रंथालयाला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु.रा.जयकर यांचे नाव देण्यात आले. २०१७ साली जयकर ग्रंथालयाचे नाव जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र करण्यात आले. विद्यापीठ जसजसे विस्तारत गेले तसे ग्रंथालय देखील विस्तारत होते. आजमितीला ग्रंथ, छापील नियतकालिके, छापील प्रबंध, हस्तलिखिते, नकाशे, ई ग्रंथ, सांगीतिक ठेवा, फोटो, ई डेटाबेस, ई नियतकालिके आदी ४ लाख ७७ हजार ग्रंथांचा संग्रह केंद्रात उपलब्ध आहे. प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे ग्रंथ आहेत. या भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमधील भाषांतरित साहित्य उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ई कॅटलॉग देखील उपलब्ध –

याविषयी माहिती देताना जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र सांगतात की, ‘’या केंद्रात विद्यापीठाच्या विविध विभागांकडून सुचविण्यात आलेल्या पुस्तकांची दरवर्षी खरेदी केली जाते. ग्रंथालयातील संख्यात्मक साहित्य दरवर्षी वाढतेच परंतु गुणात्मक दर्जा देखील टिकविण्याचा आमचा प्रयत्न असतो. या केंद्रात दुर्मिळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत, त्यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ई शोधसिंधू या योजनेमार्फत देखील २००४ सालापासून १४ ई जर्नल उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ई कॅटलॉग देखील उपलब्ध आहे.’’

हजारो विद्यार्थी ग्रंथालयाचा तसेच पाच मजली अभ्यासिकेचा लाभ घेतात –

विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक या ज्ञानस्त्रोत केंद्राचा लाभ घेतात. त्यासोबतच बाहेरील व्यक्तींना नियम व अटींचे पालन करत येथील पुस्तके संदर्भासाठी वापरता येतात. विद्यापीठातील हजारो विद्यार्थी या ग्रंथालयाचा तसेच येथे असणाऱ्या पाच मजली अभ्यासिकेचा लाभ घेतात. यात जवळपास एकूण हजार विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय करण्यात आली आहे.

The history of Savitribai Phule Pune University,’s Jaikar Library..

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात