कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने तसेच राज्य सरकार काहीच मनावर घेत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.The government poured water into the stomachs of the poor; Criticism of Sadabhau Khot
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी २६ ऑक्टोबरपासून म्हणजेच ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं.या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला.दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या चौदा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने तसेच राज्य सरकार काहीच मनावर घेत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला.
‘अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले कि चर्चा करा. मात्र, ते वारंवार सांगतायत चर्चा कुणाशी करायची. ऐन दिवाळीत राज्य सरकारने गरिबांच्या चुलीत पाणी टाकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार केले नसल्याने त्यांनी दिवाळीही साजरी केलेली नाही.असला सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी घणाघाती टीका खोत यांनी केली.
पुढे सदाभाऊ खोत म्हणाले की, एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणी साठी गेल्या चौदा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे.दरम्यान राज्य सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणार नाही.अस देखील खोत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App