महाराष्ट्रात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण सापडले. एकट्या मुंबईत ६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असताना निम्म्याहून अधिक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असताना राज्याच्या मंत्री पदावर असणार्या व्यक्तीचे हे बेजबाबदार वर्तन योग्य नाही . The Focus India Exclusive: Unrestricted Minister in the State! Maharashtra’s top health minister in Omicron, however, without a mask! MGM’s anniversary celebrated in Aurangabad
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९,१७० नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्र सरकार दररोज राज्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना देत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री देखील राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येतील अशा सुचना वारंवार देत आहेत .मात्र दुसरीकडे वेगळेच चित्र पहायला मिळाले .आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबादेत एका संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सहभागी झाले होते. या कार्यक्रमात लहान मुलांसह विद्यार्थ्यांची देखील उपस्थिती होती.
औरंगाबाद एमजीएम विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम विद्यापीठाचे अध्यक्ष अंकुशराव कदम ह्या सर्वांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांपैकी बर्याच जणांनी मास्क लावलेला नव्हता तर काही वेळासाठी स्वतः आरोग्य मंत्री देखील विनामास्कच आढळून आले .यावेळी शरद पवार हे देखील व्हर्च्युअली उपस्थित होते
महाराष्ट्र ओमिक्रॉनच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे .त्यातच निम्म्याहून अधिक मंत्री कोरानामुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत लग्न समारंभाना निर्बंध लावण्यात आले आहेत.दुसरीकडे अशा मोठ्या कार्यक्रमानांना परवानगी आणि स्वतः मंत्र्यांची उपस्थिती म्हणजे चिंतेची बाब आहे .कारण या कार्यक्रमात विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App