Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी मान्य, चौकशीसाठी न्यायालयीन समितीची स्थापना

Santosh Deshmukh

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Santosh Deshmukh बीड जिल्हयातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने न्यायालयीन समिती गठीत केली आहे.Santosh Deshmukh

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी मान्य करण्यात आली आहे.

बीड सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये बदल करावा, अशी मागणी केली जात होती. त्या मागणीनुसार राज्य सरकारने त्या समितीमध्ये बदल करत नव्या समितीची स्थापना केली होती. सीआयडी आणि या समितीकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तपासासाठी न्यायालयीन समितीचीदेखील मागणी काही जणांकडून केली जात होती.



या प्रकरणातील प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. केवळ कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा फरार आहे. त्याचादेखील शोध सुरु आहे. तसेच हत्या प्रकरणाचा कट कोणी रचला होता, हत्या का केली? याचा सखोल तपास केला जातोय. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडून कोर्टात अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर आता याच प्रकरणी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. राज्य सरकारकडून याबाबत जीआरदेखील काढण्यात आला आहे.

The demand of Santosh Deshmukh’s family is accepted, a judicial committee is set up to investigate

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात