विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या सायबर पोलिस स्टेशनने सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या सहकार्याने मोबाइल व्हॅनद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केली आहे. The cyber police station,launched a cyber security awareness drive through mobile vans
पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सायबर सुरक्षा टिप्स, प्रतिबंधात्मक उपाय आणि तक्रारी नोंदवण्याच्या प्रक्रियेची माहिती असलेल्या दोन मोबाईल व्हॅन २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी, प्रामुख्याने हवेली तालुक्यातील शाळांना भेट देतील. या मोहिमेत नागरिकांना व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप, सायबर सुरक्षेबाबत पोस्टर्सही दाखवण्यात येणार आहेत.
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. २०१८ मध्ये पुणे शहर पोलिसांना सायबर गुन्ह्यांच्या ५५२३ तक्रारी प्राप्त झाल्या. २०२९ मध्ये ही संख्या ७७९५, २०२० मध्ये १४९५० आणि २०२१ मध्ये १९०२३ वर गेली. त्यामुळे नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जागरूकता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App