२ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते.गेल्या तीन वर्षांत येथून तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली आहे.The crown of honor was lost in the crown of Maharashtra; Shirdi is one of the major airports in the country
विशेष प्रतिनिधी
शिर्डी : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली असून आता देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आता मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिर्डीत दररोज दर्शनासाठी येणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिर्डीत विमानतळ उभारण्यात आले. २ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते.गेल्या तीन वर्षांत येथून तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली आहे.दरम्यान प्रवाशांचा प्रतिसाद पाहता शिर्डीचा प्रमुख विमानतळांच्या यादीत समावेश करण्याची मागणी होत होती.
अखेर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ‘विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण कायदा २००८’अंतर्गत शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळ म्हणून घोषित केले आहे.सध्या चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबईहून या मार्गावर दररोज ६ विमाने ये-जा करतात. लवकरच ही संख्या दुप्पट होणार आहे. तसेच नाइट लँडिंगचे कामही पूर्ण झाले असून, हवामान विभागाच्या परवानगीनंतर ही सुविधा सुरू केली जाईल.
विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण कायदा २००८ क्या कलम १३ नुसार विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाला प्रमुख विमानतळांवर पुरवल्या जाणाऱ्या वैमानिक सेवांचे दर निश्चित करणे बंधनकारक आहे.यामध्ये विमानतळ विकास शुल्क, विमान अधिनियम १९३४ आणि विमानतळ कायदा १९३७ (नियम ८८) अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या प्रवासी सेवा शुल्काचा समावेश आहे.
दरम्यान ‘एमएडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विटरद्वारे म्हणाले की , शिर्डीला प्रमुख विमानतळांच्या यादीत स्थान मिळावे म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला याचा मोठा फायदा होईल. शिवाय प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App