ठाकरे मंत्रिमंडळाने काल दुकानांवरील पाट्या मराठीत असण्याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या मराठी पाट्यांसाठी खूप आधीपासून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. The credit of Marathi Names on shops belongs only to MNS Says Raj Thackeray
प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाने काल दुकानांवरील पाट्या मराठीत असण्याबाबतचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या मराठी पाट्यांसाठी खूप आधीपासून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीट करून आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु 2008, 09 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा.”
#राजभाषा_मराठी #महाराष्ट्र_धर्म pic.twitter.com/MQhQ4DGcvk — Raj Thackeray (@RajThackeray) January 13, 2022
#राजभाषा_मराठी #महाराष्ट्र_धर्म pic.twitter.com/MQhQ4DGcvk
— Raj Thackeray (@RajThackeray) January 13, 2022
आपल्या पत्रात ते पुढे म्हणाले की, यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की, मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका! पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मन:पूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील- मराठी भाषा मंत्री @Subhash_Desai यांची माहिती pic.twitter.com/TSYHphW9uO — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 12, 2022
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील- मराठी भाषा मंत्री @Subhash_Desai यांची माहिती pic.twitter.com/TSYHphW9uO
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 12, 2022
दरम्यान, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. पूर्वीच्या नियमात एक पळवाट मराठी पाट्या डावलल्या जात होत्या. आधी जिथे १० पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्यांनाच मराठी पाट्यांचं बंधन होतं. परंतु आता या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून १० पेक्षा कमी असणाऱ्या आस्थापनांमध्येही मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आपल्या आहेत.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App