कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या भारत देशात अवदसा आली. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूलासुद्धा पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. The codes in the country, only Modi’s tarantry, a strong criticism of Praniti Shinde
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या भारत देशात अवदसा आली. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूलाही पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.
पुढे प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. ते एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळीच ते माध्यमांसमोर समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाज बरी वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला (कॉंग्रेस) मतदान केलं तर ते भाजपला जातं.
शिंदे म्हणाल्या, ‘आधी शिक्का मारून केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” अशा शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App