विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister मुख्यमंत्री लाडक्या योजनेचे पुढचे पैसे निवडणूक आचारसंहितेत बिलकुल अडकणार नाहीत. कारण 20 तारखेला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींचे डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच देऊ, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, पण एकीकडे मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले, तरी शरद पवारांना मात्र लाडक्या बहिणी खुश दिसल्या नाहीत.Chief Minister
लाडकी बहीण योजनेचे चार हप्ते शिंदे फडणवीस सरकारने दिले. यापैकी नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्येच निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दिला. पण डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार??, याविषयी सोशल मीडिया चर्चा सुरू झाली. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. 20 नोव्हेंबरला मतदान आहे 23 तारखेला निकाल आहे. त्यानंतर नोव्हेंबरचे 7 दिवस हातात आहेत या 7 दिवसांमध्येच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळेल त्यात कुठलीही अडचण येणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मात्र, शरद पवारांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरताना लाडक्या बहिणी खुश दिसल्या नाहीत. हे स्वतःच त्यांनी दिवाळी पाडवा कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे एकीकडे दिले, दुसरीकडे महागाईच्या रूपाने ते काढून घेतले, असे आपल्याला काही महिलांनी सांगितल्याचा दावा पवारांनी केला. यातून महायुतीने आपल्या एकगठ्ठा मतदानाची सोय केलेल्या महिला नाराज असल्याचा नॅरेटिव्ह शरद पवारांनी पुढे सरकवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App