सीजे हाऊस, इक्बाल मिर्चीची मालमत्ता ED कडून जप्त; सही करण्यासाठी प्रफुल्ल पटेल ED च्या कार्यालयात

वृत्तसंस्था

मुंबई – कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमचा मुंबईतला म्होरक्या इक्बाल मिर्ची याची मालमत्ता सक्तवसूली संचलनालयाने जप्त केली आहे. त्या मालमत्तेसंदर्भात कन्फर्मेशन सही करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना आज ED कार्यालयात हजेरी लावावी लागली.

प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुख्यात दहशतवादी, गुंड दाऊद इब्राहिमचा म्होरक्या इक्बाल मिर्ची याच्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. हा व्यवहार प्रफुल्ल पटेल यांनी वैध असल्याचा दावा केला आहे. पटेल यांच्या कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मिर्ची उर्फ मेमनसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे.

आरोपात तसा स्पष्ट उल्लेख आहे. याचा तपास सध्या ED करीत आहे. सीजे हाऊस ही वरळीतली हायप्रोफाईल सोसायटी आहे. जी पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने विकसित केल्याची ED ची माहिती आहे. ती ED ने जप्त केली आहे. तिच्या कन्फर्मेशनवर सही करण्यासाठी ED ने बोलावल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना त्या कार्यालयाच्या बाहेर सांगितले.

२०१९ मध्ये एका पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी आपले कुटुंब आणि ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या इक्बाल मेमन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारावर दावा आणि खुलासा केला होता. ज्या सीजे हाऊस या व्यवहारावरून आरोप करण्यात येत आहेत, तो व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला होता.

त्यावेळी संबंधित जमिनीचा इतिहास देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला होता. कशाप्रकारे ही वादग्रस्त जमीन १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम. के. मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इक्बाल मिर्ची याला विकण्यात आली होती. २००४ रोजी इक्बाल मिर्ची उर्फ मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इक्बाल मिर्ची उर्फ मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता,” असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.

परंतु, तेव्हा केंदात काँग्रेसच्या आघाडीचे म्हणजे UPA चे सरकार होते. त्यात शरद पवार हे कृषिमंत्री आणि प्रफुल्ल पटेल हे नागरी हवाई वाहतूक मंत्री होते. महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार होते. हे मात्र, त्यावेळी सांगायला प्रफुल्ल पटेल विसरले होते.

The case related to underworld don Iqbal Mirchi | Senior NCP leader, Praful Patel leaves from Enforcement Direactorate (ED) office in Mumbai.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात