विशेष प्रतिनिधी
मुंबई: आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणारी परीक्षा ही रद्द झाली होती. परीक्षेच्या एक दिवस आधीच ही परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मनस्ताप सहन करावा लागल्याने विद्यार्थी वैतागलेले होते.The abruptly canceled health department exams will take place in October
आता ही पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.अचानक रद्द करण्यात आलेल्या परीक्षेविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली कारण यामागे काही उमेदवारांचे हित हा मुद्दा होता.
ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच आर्थिक फटका देखील बसला होता. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलता आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला परीक्षा घेण्यात येतील. जर पुढे ढकलता आल्या नाही आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App