उपमुख्यमंत्री फडणवीसांची संवेदनशीलता; आमदार उमा खापरेंच्या पाठपुराव्यामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या तरुणाची सुखरुप सुटका

प्रतिनिधी

पिंपरी : जनतेच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचे उदाहरण समाेर आले आहे. आमदार उमा खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधल्याने कुवेतमध्ये अडचणीत सापडलेल्या कराडमधील तरुणाची सुटका झाली आहे. Thanks to MLA Uma Khaparen’s follow-up, a young man stuck in Kuwait was safely released

कुवेतमध्ये एक तरुण अडकल्याची माहिती आमदार खापरे यांच्याकडून मिळाल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने सूचना दिल्या. त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयाने तत्परता दाखविल्याने या तरुणाची सुटका हाेऊ शकली.

सागर सुभाष संकपाळ (वय २८, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) हा तरुण कुवेत (दुबई) येथे जादा पगाराच्या अमिषाने कामासाठी गेला होता. सुमारे दीड महिना काम करुनही त्याला व्यवस्थित वेतन मिळाले नाही. त्याची तेथे दयनीय अवस्था झाली. कंपनीतील अधिकाऱ्यांना मायदेशी सोडण्याची मागणी केली. त्यांनी उलट त्याचा पासपोर्ट आणि मोबाईल जप्त केला. भाजपाच्या आमदार उमा खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने केंद्रीय विदेश मंत्रालयाशी तत्काळ पत्रव्यवहार केल्यामुळे सागरची १० दिवसात सुखरुप सुटका होऊन तो मायदेशी परतला. आमदार उमा खापरे आणि सागरच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्र्यांसाेबतच त्यांचे दिल्ली येथील स्वीय सहायक मनाेज मुंढे यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सागर आणि त्याची सुटका करण्यासाठी धावपळ करणारे त्याचे बंधू रोहित यांच्यासह आमदार खापरे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सागर संकपाळचे आयटीआयचे शिक्षण झाले असून तो सीएनसी बेन्डींग ऑपरेटरचे काम करतो. ४२ हजार रुपये पगाराचे अमिष झाल्याने त्याने नोकरी डॉट कॉमवर अर्ज करुन नाशिक येथील एका एजन्सीच्या माध्यमातून कुवेत येथे नोकरीसाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी गेला. सागरने १६ सप्टेंबरपासून ‘दकील अलजेसर’ कंपनीत काम सुरु केले.



सागर म्हणाला की, तो सहकाऱ्याबरोबर स्वयंपाक करुन जेवायचा. परंतु त्याला खाण्याच्या पदार्थातून काही तरी दिले जात असल्याची शंका आहे. मला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याने कंपनीत अधिकाऱ्यांकडे मायदेशी परत सोडण्याची मागणी केल्यावर माझा पासपोर्ट आणि मोबाईल जप्त करण्यात आला. मी दीड महिने काम केलेले असताना मला १५ दिवसांचाच पगार दिला. माझ्यावर शारीरीक अत्याचार करुन खोलीतून हाकलून दिले. त्यामुळे माझी मनःस्थिती बिघडली. माझे बंधू रोहित यांच्या मी संपर्कात होतो.
सागरचा मोबाईल लागत नसल्याने १९ सप्टेंबरला सागरचे बंधू रोहित यांनी प्रथम एजन्सीशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. रोहित यांनी सागरच्या अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सागरला बाहेर काढल्याची माहिती मिळाली. रोहितने भाजपाच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खापरे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करुन विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. खापरे यांनी वारंवार पत्रव्यवहाराचा पाठपुरावा केला. केंद्रीय विदेश मंत्रालयाने खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सागरला मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली.

याबाबत उमा खापरे म्हणाल्या, मी प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले. त्यांनी तत्काळ त्यांच्या दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंढे यांना संपर्क साधून विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यास सांगितला. आम्ही तत्काळ दि. १ नोव्हेंबरला पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केल्याने त्याची सुखरुप सुटका झाली.

Thanks to MLA Uma Khaparen’s follow-up, a young man stuck in Kuwait was safely released

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात