या तीन मुलींमध्ये शंकर महाजन यांच्या मुलीसह त्यांच्याकडे पाहुण्या आलेल्या दोन भाच्यांचाही समावेश आहे.Thane: Three girls were injured when the plaster of a house slab collapsed
विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा नंबर दोन येथील गणेश कृपा सोसायटी नंबर दोन मधील चौथ्या मजल्यावरील घरातील (सिलिंग) स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला.
यामध्ये शंकर महाजन यांच्या तीन लहान मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत.या तीन मुलींमध्ये शंकर महाजन यांच्या मुलीसह त्यांच्याकडे पाहुण्या आलेल्या दोन भाच्यांचाही समावेश आहे.ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
या दुर्दैवी घटनेत मानसी जाधव (१०) हिच्या उजव्या पायाला तर आस्था गोडसे (१०) हिच्या पाठीवर आणि तनिष्का महाजन (९) हिच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.या घटनेची माहिती कळताच,
ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग खाली पडला आणि तडा गेला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App