परिसरात असलेल्या अंडरग्राउंड 35 फूट खोल टाकी आहे. टाकीवरील छाकणाला भगदाड पडलेले होते.याच भगदाडातून साहिल जयस्वाल हा टाकीत पडला. Thane: A 10-year-old boy fell into a 35 feet deep underground tank in Nalpada area and was seriously injured.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाण्यातील नळपाडा परिसरात एका 10 वर्षांचा मुलगा 35 फूट खोल अंडरग्राऊंड टाकीत पडण्याची दुर्दैवी घटना घडली. मुलाला बाहेर काढण्यात आले असून कळव्याच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.साहिल जयस्वाल असं या 10 वर्षीय मुलाचे नाव आहे.
ठाण्याच्या नळपाडा परिसरातील कृष्णा कंपाउंड, अष्टविनायक ग्राउंड परिसरात काल संध्याकाळी ही घटना घडली.परिसरात असलेल्या अंडरग्राउंड 35 फूट खोल टाकी आहे. टाकीवरील छाकणाला भगदाड पडलेले होते.याच भगदाडातून साहिल जयस्वाल हा टाकीत पडला, असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
साहिल टाकीत पडल्याचे कळताच स्थानिकांनी धाव घेतली.तसेच अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम अग्निशमन दल एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यूव्हॅन दाखल झाली.दरम्यान मोठ्या मेहनतीनंतर साहिलला टाकीतून बाहेर काढण्यात आले.या दुर्घटनेची नोंद कापूरबावडी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून या घटनेचा तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App