ठाण्यात १५ डान्स बारना ठोकले सील; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

विशेष प्रतिनिधी

ठाणे : सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील १५ डान्स बारवर महापालिकेच्या पथकाने सील ठोकले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली असून कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 15 Dance Bars sealed in Thane: Muncipal corporation take action promptly

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.

ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ डान्सबार सील करण्यात आले.

  • ठाण्यात १५ डान्स बारना ठोकले सील
  • महापालिकेच्या पथकाने टाकले छापे
  • कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई
  • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी नको
  • कारवाई सुरूच ठेवण्याच्या आयक्तांच्या सूचना
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक

15 Dance Bars sealed in Thane: Muncipal corporation take action promptly