विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्ग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजप आणि शिंदे सेनेवर टीकेचे ठोके मारले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर टीकेचे आसूड ओढले, पण महायुती सरकार मधल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना टीकेपासून नामानिराळे ठेवले. Thackeray, pawar targets only BJP and shinde shivsena, but spears ajit pawar’s NCP
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री नारायण राणे वगैरे नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातल्या काही प्रतिक्रिया विचित्र ठरल्या. विशेषतः दीपक केसरकरांनी वाईटातून चांगले घडते ही व्यक्त केलेली प्रतिक्रिया महायुतीला चांगलाच मार देऊन गेली. महायुतीच्या सरकारने पुतळ्याची सगळी जबाबदारी नौदलावर ढकलली. त्यातूनही महायुतीचे सगळेच नेते अडचणीत आले. भाजपचे केंद्रीय नेतृत्व महायुतीतल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांवर नाराज झाल्याच्या बातम्या त्यातूनच समोर आल्या.
नारायण राणेंचे समर्थक मालवण मध्ये आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांना भिडले. पण महायुती बॅक फुटवर गेल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते अधिक आक्रमकपणे पुढे आले. आज शरद पवार आणि नाना पटोले मातोश्रीवर पोहोचले. तिथे उद्धव ठाकरेंनी या दोन नेत्यांसमवेत पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार विरोधात जोडे मारा आंदोलन करण्याची घोषणा केली. ठाकरे, पवार आणि नाना पटोले यांनी आपल्या सगळ्या टीकेचा रोख भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांवर ठेवला, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीला त्यांनी नामानिराळे ठेवले. पुतळ्याचे ठेकेदार आणि शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असल्याचा मुद्दा या सगळ्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरच शेकवला.
Jay Shah : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा; ICC च्या अध्यक्षपदी जय शाह; पाचवे भारतीय अध्यक्ष!!
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सावता सुभा मांडत महायुती सरकारच्या विरोधात जाईल, अशाच स्वरूपाचे ट्विट केले. त्यामुळे मिटकरींनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.
या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि बाकीचे राष्ट्रवादीचे नेत्यांनी स्वतःला जनसन्मान यात्रेतच गुंतवून ठेवले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जी काही आगपाखड व्हायची ती, भाजप आणि शिंदे सेनेवर होऊ देत, आपण त्यापासून अलिप्त राहावे, असा हिशेब अजितदादांच्या राष्ट्रवादीने करून तो अंमलात आणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App