प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार केव्हाही कोसळू शकते, असे राजकीय भाकीत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरू लागल्या. या पार्श्वभूमीवर सायंकाळनंतर राजकीय बैठकांच्या सिलसिला वेगात आला आहे. Thackeray – Pawar Govt Unstable
महाविकास आघाडीचे मंत्री राजभवनावर पोहोचले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्याशी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक तसेच विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती या विषयावर चर्चा केली.
– फडणवीस – राज्यपाल चर्चा
सत्ताधारी पक्षातून मंत्री राजभवनातून बाहेर पडताच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमदार आशिष शेलार यांच्यासह राजभवनावर पोहोचले. त्यांनी राज्यपालांची काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, एक निमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो होतो एवढेच सांगून देवेंद्र फडणवीस तेथून निघून गेले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विधान परिषदेवर आमदारांची नियुक्ती या मुद्द्यांवर राज्यपाल सकारात्मक आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व इतर मागास वर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. pic.twitter.com/KvZCidFJtD — Governor of Maharashtra (@maha_governor) March 11, 2022
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व इतर मागास वर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. pic.twitter.com/KvZCidFJtD
— Governor of Maharashtra (@maha_governor) March 11, 2022
राजभवनाच्या भोवती सत्ताधारी आणि विरोधक यांचे प्रतिनिधी फिरत असतानाच तिकडे “वर्षा” बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या नेत्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, असे तपशील उघड झाले नाहीत. परंतु काल भाजपने चार राज्यांमध्ये मोठा विजय मिळवला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कारवाई थांबणार नाहीत, असे स्पष्ट सांगितले धर्म – जात असे विषय काढून केंद्रीय तपास संस्थांनी आणलेले अडथळे सहन करणार नाही, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर “वर्षा” बंगल्यावर झालेली उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
– मालिकांचा राजीनामा “गले की हड्डी”
देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतरची देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे. नवाब मलिक यांचा राजीनाम्याचा मुद्दा महाविकास आघाडीसाठी “गले की हड्डी” बनला आहे. यामध्ये या बैठकीत या विषयावर देखील चर्चा झाल्याचे मानण्यात येत आहे.+
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App