The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ – शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट- प्रत्येकानं बघावा असा सिनेमा- लपवलेला हिंदूंचा इतिहास-अनुपम खेर म्हणतात हा अभिनय नव्हे जिवंत इतिहास…
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काश्मीरी पंडित यांच्या जीवनावर आधारित आणि वास्तवदर्शी कथानक असणारा ‘द कश्मीर फाईल्स’ आज ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे.याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता.The Kashmir Files: ‘The Kashmir Files’ – Sharad Ponkshe’s Facebook post – a movie that everyone should watch – hidden history of Hindus
या चित्रपटाबाबत आधीच लोक अतिशय उत्सुक होते. यानंतर जेव्हा चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले तेव्हा अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाने माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनीही आपली प्रतिक्रिया फेसबुक पोस्टमधून दिली आहे. शिवाय प्रत्येकाने हा चित्र पाहावे असे सांगत आपण भावनिक झाल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3173329862956224&id=100008377242826&sfnsn=wiwspmo
द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित आहे. साल १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी केलेल्या स्थलांतरावर आणि काश्मीरमध्ये झालेल्या नरसंहाराचे हा चित्रपट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. तर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी लिहिले आहे कि, प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात. असं शरद पोंक्षे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
https://www.instagram.com/tv/Ca76GpyF0NU/?utm_source=ig_web_button_share_sheet
अनुपम खेर यांची पोस्ट
‘तुमच्या आशिर्वादामुळे मी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात स्वत:चं नाव कमावू शकलो. पण ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात मी कुठलाही अभिनय नाही केला. तो जिवंत इतिहास आहे’, असं अनुपम खेर म्हणालेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App