विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यासच मोबाईल फोनचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे. अतिरिक्त मोबाईल वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे अजब तर्कट सरकारने लढविले आहे. Thackeray – pawar govt applies break on mobile use of govt servents to save its collapsing image
देशात पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे – पवार सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करून लँडलाईन फोन वापरासाठी अधिक सोयीस्कर असल्याचे सांगितले आहे. सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या आदेशात राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असे सांगितले आहे.
कार्यालयीन वेळात मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले आहे. जर मोबाईल फोन वापरायचे असतील तर टेक्स्ट मेसेजचा अधिक वापर करावा आणि या उपकरणांद्वारे केलेली संभाषणे कमी केली जावीत. कार्यालयीन वेळेत मोबाईलद्वारे सोशल मीडियाचा वापर मर्यादित असावा, असे सरकारने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App