प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा ठाकरे पवार सरकार अजून राजीनामा घेत नाही या मुद्द्यावरून राणे बंधून मध्ये प्रचंड संख्या पासून त्यांनी एकापाठोपाठ एक असे ठाकरे पवार सरकारवर प्रहार चालवले आहेत निलेश राणे यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार झाल्यानंतर देखील त्यांच्या फरक पडलेला नाही.Thackeray – Pawar – Dawood rane brothers
नवाब मलिक हे दाऊदला मदत करत असल्याचे पुरावे असताना त्यांचा आजही राजीनामा घेतला जात नाही. मग हे सरकार काय दाऊदचे आहे का? तसे असेल तर मग मंत्र्यांनी आपल्या केबिनमध्ये गांधीजींचे फोटो काढून तिथे दाऊदचे फोटो लावावेत आणि त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तडकफडकीने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला. पण दाऊदसारख्या दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाबाबतचे सर्व पुरावे हे नवाब मलिकांच्या विरोधात असताना त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही?, हे सरकार काय दाऊदचे सरकार आहे का? मग इतकं असेल तर मंत्र्यांनी आपल्या केबिनमध्ये गांधीजींचे फोटो काढून दाऊदचे फोटो लावावेत, त्याच्या फोटोपुढे नतमस्तक होऊन रहावे. त्याचे एक स्मारक बांधून त्याला राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण द्यावे, अशी झणझणीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.
हिंदूंवर अन्याय होऊ देणार नाही
आम्ही केवळ हिंदूंची बाजू घेतली आहे. नवाब मलिक हे मुस्लिम कार्यकर्ता आहेत असा प्रश्न जेव्हा शरद पवार यांनी उपस्थित केला तेव्हा आम्ही एवढेच बोललो, की अनिल देशमुख यांचा राजीनामा ते हिंदू आहेत म्हणून घेतला आहे का?, मग यात आम्ही दंगल कुठे भडकवली? आम्ही हिंदू म्हणून आमची भूमिका मांडली आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही कुठल्याही हिंदूवर अन्याय होऊ देणार नाही. हिंदुत्वाची बाजू घेणे ही जर चूक असेल तर आम्ही 100 वेळा चूका करू, असे राणे म्हणाले.
– राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नितेश आणि निलेश राणे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राणे बंधुंनी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत थेट संबंध असल्याचे वक्तव्य करुन त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे या तक्रारीत चव्हाण यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App