विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गट झोपलेला, काँग्रेसची पाठ मोडली, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. पण त्यामुळे याच निवडणुकीत पराभव होऊन देखील पवार गटाची मस्ती जिरली का??, असा सवाल तयार झाला.
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस दोन दिवसांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झाली. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली. निवडणुकीनंतर निवडणुकीत ठाकरे गट जो झोपलाय, तो अजूनही झोपलेलाच आहे, तर काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, पण आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. त्यामुळे आपण मरगळ झटकून लवकर कामाला लागावे विरोधी पक्षांची फार मोठी स्पेस भरून काढावी, असे अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे यांच्या टीकेनंतर संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार भडकले. त्यांनी जागा वाटपावरून पवार गटाचे वाभाडे काढले. पण या सगळ्यात अमोल कोल्हे यांनी जरी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि काँग्रेसवर टीका केली असली तरी खुद्द त्यांच्या पक्षाची तरी मस्ती गेली आहे का??, असा सवाल तयार झाला. कारण ज्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बैठकीत अमोल कोल्हे यांनी टीका केली, त्याच बैठकीमध्ये पक्षातल्या तरुण नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या ऐवजी आमदार रोहित पवार किंवा रोहित पाटलांना मोठी जबाबदारी द्या, अशी मागणी शरद पवारांकडे केल, पण त्याही पलीकडे जाऊन पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या कार्यकर्त्यांनी पवारांसमोर पक्ष संघटनेचे पुरते वाभाडे काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 17 – 17 वर्षे एकच जिल्हाध्यक्ष 10 – 12 वर्षे एकच तालुका अध्यक्ष असताना पक्षाची संघटना वाढणार कशी?, बाकीच्या लोकांना संधी मिळणार केव्हा आणि कशी??, असे परखड सवाल कार्यकर्त्यांनी शरद पवारांनाच केले. एरवी शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे पवारांचे “संस्कार”, पवारांचे “संघटन कौशल्य” या विषयावर बाता मारतात. परंतु, पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच पक्ष संघटनेचे जिल्हा जिल्ह्यांमध्ये कङशा चिंधड्या उडाले आहेत, पक्षाच्या संघटनेवर विशिष्ट नेते आणि व्यक्ती कसा कब्जा जमवून बसले आहेत, याचेच वाभाडे काढल्याने पवारांच्या पक्ष संघटनेत तरी पराभवानंतर गटबाजी संपली आहे का आणि पवारांच्या पक्षाची मस्ती जिरली आहे का??, असे सवाल तयार झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App