
एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर दुसरीकडे नॉटी जमात ही जी लोकं इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं खरं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.Thackeray government targets those trying to save lives of others, targets Amrita Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर दुसरीकडे नॉटी जमात ही जी लोकं इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं खरं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
राज्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज असताना भारतीय जनता पक्षाने दमण येथील कंपनीकडून पन्नास हजार इंजेक्शन मागविली होती. मात्र, ठाकरे सरकारने या कंपनीच्या मालकालाच रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले. त्याच्या घराला पोलीसांनी वेढा दिला.
त्यांना सोडविण्यासाठी गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे.
वांगणी रेल्वे स्थानकावर पॉइंटमन मयूर शेळके याने एका अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवला. हा व्हिडीओ शेअर करता अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नॉटी जमात प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाºयांच्या जीवावर उठली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.