Amruta Fadnavis Strong Reply To Bhai Jagtap gave evidence Of Police Salary Accounts Transfered in NCP Cong Govt During 2005

अमृता फडणवीसांनी थेट पुरावे देऊन भाई जगतापांची बोलतीच केली बंद, पुन्हा लगावला टोला

Amruta Fadnavis Strong Reply To Bhai Jagtap : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगतापांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अॅक्सिस बँकेत वळवण्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. यावर अमृता फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत भाई जगतापांवर पलटवार केला. यानंतर भाई जगताप आणि अमृत फडणवीस यांच्यात वाक्युद्ध पेटल्याचं दिसून आलं. आता पुन्हा एकदा थेट पुरावेच देऊन अमृता फडणवीस यांनी भाई जगतापांची बोलती बंद केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगतापांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अॅक्सिस बँकेत वळवण्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. यावर अमृता फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत भाई जगतापांवर पलटवार केला. यानंतर भाई जगताप आणि अमृत फडणवीस यांच्यात वाक्युद्ध (Amruta Fadnavis Strong Reply To Bhai Jagtap) पेटल्याचं दिसून आलं. आता पुन्हा एकदा थेट पुरावेच देऊन अमृता फडणवीस यांनी भाई जगतापांची बोलती बंद केली आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

पोलीस कर्मचाऱ्यांची पगाराची खाती अॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय आघाडी सरकारच्याच काळात झाल्याचा थेट पुरावाच अमृता फडणवीस यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!” असे म्हटले आहे.

तत्पूर्वी अमृता फडणवीस यांच्या आधीच्या ट्विटवर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना भाई जगताप म्हणाले होते की, ‘खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, मी केवळ सवाल केला होता.’ भाईंच्या या प्रतिक्रियेनंतरच अमृता फडणवीस यांनी थेट पुरावेच आपल्या ट्वीटमध्ये जोडले आहेत.

काय आहेत पुरावे?

अमृता फडणवीस यांनी पुन्हा ट्वीट करून आघाडी सरकारच्या काळातला 2005 सालचा आदेशच पुरावा म्हणून जोडला आहे. ट्वीटमध्ये अमृता फडणवीस भाई जगतापांना टोला लगावत म्हणाल्या की, जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खोटे ऐकून ऐकून खराब वटतंच- हे भाई जगतापला कसे कळणार?. वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात. थोडं तर खरं बोलायला शिका!’ यानंतर जगतापांना सुनावत त्या म्हणाल्या की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातला म्हणजेच तुमच्याच काळातला २००५ चा विशिष्ट आदेश बघा. आता तरी चूक कबूल करून गप बसा!’

भाई जगतापांचा दावा ठरला फोल

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा राजीनामा घेण्यात यावा, असे म्हटले. यानंतर फडणवीसांना प्रत्युत्तर देताना भाई जगताप म्हणाले होते की, गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे? भाई जगतापांचे हेच वक्तव्य कसे निराधार आहे, हे अमृता फडणवीस यांनी आक्रमक होत पुराव्यानिशी दाखवून दिले.

Amruta Fadnavis Strong Reply To Bhai Jagtap gave evidence Of Police Salary Accounts Transferred in NCP Cong Govt During 2005

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*