तसेच टीईटी परीक्षेतल्या गैर प्रकाराची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. TET exam scam case: State Examination Council Commissioner accused Tukaram Supe suspended
विशेष प्रतिनिधी
मुंबई : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मुख्य राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आरोपी तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे.सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
तसेच टीईटी परीक्षेतल्या गैर प्रकाराची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक अहवाल सात दिवसांच्या आत तर सविस्तर अहवाल १५ दिवसांत देण्याचे आदेशही या समितीला देण्यात आले आहेत.
२०१९ -२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि.१६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
निलंबनाचा आदेश जेवढे दिवस अंमलात असेल तोपर्यंत सुपे हे पुणे येथे राहतील.दरम्यान त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. जर नोकरी स्वीकारली तर सुपे गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही निलंबनच्या आदेशात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App