वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले. Testing to start 10th, 12th classes in corona-free villages; Instructions from the Chief Minister
शिक्षण विभागाची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनामुक्त असलेले व भविष्यातही कोरोनामुक्त राहू, अशी केवळ ग्वाही देणारी नव्हे तर त्यानुसार कृती करणाऱ्या गावांचा या बाबत विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने दहावीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली, त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा. त्यानुसार प्रस्ताव सादर करा, असे ते म्हणाले.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याची योजना आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासाठी निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
हिवरे बाजार पॅटर्न राज्यात लागू
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या नेतृत्वात हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथे शाळा सुरू झाली आहे. गाव कोरोनामुक्त असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्या धर्तीवर राज्यात आता चाचपणी केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App