भीषण अपघात! समृ्द्धी महामार्गावर बस जळून खाक, २५ प्रवाशांचा मृत्यू


ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सिंदखेडराजाजवळ हा अपघात  घडला.

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघाताचे  सत्र थांबताना दिसत नाही.  आता बुलढाण्यात एका प्रवासी बसचा या महामार्गावर भीषण अपघात घडला आहे.  भयानक आणि अतिशय दु:खद बाब म्हणजे या भीषण अपघातात २५  प्रवाशांचा जीव गेला  आहे, तर बस जळून खाक झाली आहे. Terrible accident Bus catches fire on Samruddhi highway 25 passengers die

ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान रात्री दीड वाजण्याच्या सुमारास  बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ  रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट  घेतल्याने प्रवाशांचा आगीत  होरपळून मृत्यू  झाला. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी काचा फोडून कसेबसे बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा  भीषण अपघात झाला.या बसमध्ये ३२ प्रवासी होते, त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.

Terrible accident Bus catches fire on Samruddhi highway 25 passengers die

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*